कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीत फेरीवाले कृती समितीचे दिलीप पवार आणि किरण गवळी यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाला. या विजयानंतर फेरीवाल्यांनी मोठा जल्लोष केला. दिलीप पवार यांना 1 हजार 655 तर किरण गवळी यांना 1 हजार 513 मतं मिळाली. दत्ता चौगुले यांना 61 आणि इंद्रजित शेट्टी यांना 586 मतं मिळाली. यामध्ये नोटासाठी 11 मतं पडली आणि 24 मतं बाद झाली.
यामध्ये अनुसुचित जाती महिला गटामधून सरोज कांबळे, अल्पसंख्याक महिला गटामधून मुमताज बागवान, इतर मागास प्रवर्ग गटामधून नंदकुमार वळंजू, सर्वसाधारण महिला गटामधून शेवंताबाई जाधव, दिव्यांग गटामधून अमर छत्री यांची बिनविरोध निवड झाली. ही निवडणूक आणि मतमोजणी प्रक्रिया प्रशासक के.मंजूलक्ष्मी, निवडणूक निर्णय अधिकारी उपआयुक्त साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विजय पाटील, नोडल ऑफिसर विलास साळुंखे, सुधाकर चल्लावाड, एनयुएलएमचे व्यवस्थापक रोहित सोनुले, विजय तळेकर, विजय वणकुद्रे यांनी कामकाज पाहिले.