जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजन
चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आंबेरी ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिलादिनानिमीत्त गुरुवार दिनांक ९ मार्च रोजी आयोजित मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ३५ जणांनी नेत्र तपासणी आणि ४० जणांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
तत्पूर्वी कृषि अधिकारी संजय गोसावी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आंबेरी सरपंच मनोज डिचोलकर, उपसरपंच रविंद्र परब, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक स्वाती कदम, माजी पंचायत समिती सदस्या श्रद्धा केळुसकर, ग्लोबल फाउंडेशनचे मिनर्वास परब, उमेश गावडे, गणेश डिचोलकर, कमलेश वाक्कर, पुर्वा मुसळे, वृंदा केळुसकर, मिनल सावंत, सुचिता कांबळे, मुख्याध्यापक धानजी चव्हाण, मुख्य सेविका तुळसकर, एस. बी. सरमळकर, एस. एस. सुतार, माया इन्सुलकर, कुबल मॅडम, शिंदे मॅडम, केशव मुसळे, शरद केळुसकर, भरत परब, संजय कुलकर्णी, जयेश तावडे, सदाशिव डिचोलकर, सुप्रिया पेडणेकर आदी मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.