मार्च २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात वैभववाडी तालुक्यातील अनेक कामांना मंजुरी

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी वेधले होते पालकमंत्र्यांचे लक्ष

वैभववाडी (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सदरच्या अर्थसंकल्पात वैभववाडी तालुक्यातील काही कामांसदर्भात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे काही कामासंदर्भात निवेदनाद्वारे मागणी केली होती. सदर कामांना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी तात्काळ मंजुरी दिली आहे.

यामध्ये खारेपाटण- तिथवली- भुईबावडा -गगनबावडा रस्ता रा.मा.१७१ कि.मी.०/००० ते १७/००० मध्ये सुधारणा, मजबुतीकरण व नुतनीकरण करणे अंदाजीत रक्कम ६६१०००००, खारेपाटण -तिथवली -भुईबाबडा – गगनबावडा रस्ता रा.मा.१७१ कि.मी १७/१०० ते ३४/७०० मध्ये भौमितिक सुधारणा व मजबुतीकरण व नुतनीकरण करणे अंदाजीत रक्कम ६९७०००००, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा -कणकवली- केनेडी -फोंडा -उंबर्डे रस्ता रा.मा.१८१ कि.मी. ७३/००० ते ७६/००० मध्ये सुधारणा व नुतनीकरण करणे. अंदाजीत रक्कम २५०००००० व आचरा -कणकवली- केनेडी -फोंडा -उंबर्डे रस्ता रा.मा.१८१ कि.मी. ८१/००० ते ८६/५०० मध्ये सुधारणा व नुतनीकरण करणे अंदाजीत रक्कम ४४०००००० तसेच नापणे रेल्वे स्टेशन ते कुसुर रस्ता ग्रा.मा.क्र.७५ कि.मी.०/०० ते १/०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे अंदाजीत रक्कम १००००००, कोर्ले धालवली – वारगाव -नाधवडे- कोकीसरे- खांबाळे रस्ता प्र.जि.मा.५ मधील कि.मी.७/००० ते २२/००० मध्ये सुधारणा मजबुतीकरण व डांबरीकरण करणे अंदाजीत रक्कम ७१५०००००, करुळ -नावळे-सडुरे- कुर्ली घोणसरी फोंडा रस्ता प्र.जि.मा. ६ मधील कि.मी.१२/००० ते १९/६०० मध्ये सुधारणा मजबुतीकरण व नुतनीकरण करणे अंदाजीत रक्कम ४१८०००००, व नापणे जोडरस्ता ग्रा.मा.क्र.७४ वर उंबर्डे नायदेववाडी येथे ब्रिज बांधणे अंदाजीत रक्कम २१४५००००० रुपये असे एकूण ५३३,६००,००० रूपयांचा निधी मंजूर केला आहे. आपल्या मागणीवर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल प्रमोद रावराणे यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!