कणकवली (प्रतिनिधी) : ऍक्टिव्ह टिचर्स महाराष्ट्र आयोजित शिक्षकांचे साहित्य संमेलन नुकतेच पुणे येथे संपन्न झाले.या संमेलनात भैरव विद्यालय, घाटकोपर, मुंबई येथील शिक्षिका मिताली महेंद्र तांबे यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शिक्षण क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मा.डॉ.कमलादेवी आवटे(उपसंचालक, SCERT, पुणे तथा भाषा अभ्यासक ),डॉ. वसंत काळपांडे (पूर्व शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य),डॉ.गोविंद नांदेडे (पूर्व शिक्षण संचालक,महाराष्ट्र राज्य),दिनकर टेमकर (पूर्व शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य),सुरज मांढरे, भा.प्र.से.(शिक्षण आयुक्त,महाराष्ट्र राज्य),कौस्तुभ दिवेगावकर, भा.प्र.से. (संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे),शरद गोसावी (अध्यक्ष, म.रा. माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ, पुणे तथा शिक्षण संचालक प्राथ.),कृष्णकुमार पाटील (संचालक, बालभारती तथा माध्य. व उच्च माध्य. शिक्षण संचनालय, पुणे),रमाकांत काठमोरे (सह संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे), दिपक चवणे (शिक्षण उपसंचालक, माध्य. व उच्च माध्य. शिक्षण संचनालय, पुणे),डॉ. नेहा बेलसरे (उपसंचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे), डॉ. प्राची साठे (शिक्षण अभ्यासक तथा माजी OSD, शिक्षण मंत्रालय, महाराष्ट्र ),डॉ. शोभा खंदारे (प्राचार्य, DIET, पुणे),डॉ. ज्योती परिहार (सहसचिव, म.रा. माध्य व उच्च माध्य विभागीय, शिक्षण मंडळ, नवी मुंबई), नवनाथ वनवे (शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभाग),डॉ. राजेश बनकर (उपविभाग प्रमुख, भाषा SCERT, पुणे)सचिन चव्हाण (उपविभाग प्रमुख, सा. शास्त्र, SCERT, पुणे),योगेश सोनवणे (उपविभाग प्रमुख, SCERT, पुणे),अरूण सांगोलकर (विभाग प्रमुख, जीवन शिक्षण, SCERT, पुणे),अनिल खिलारे (मुख्या. भावे प्राथमिक शाळा, पुणे),पोपट काळे (निवृत्त शिक्षणाधिकारी),किरण केंद्रे,डॉ.विशाल तायडे, ज्योती दीपक बेलवले, आणिविक्रम अडसूळ यांच्या उपस्थितीत ‘ मितकाव्य ‘ या कवितासंग्रहाचे प्रकाशन मोठ्या दिमाखात झाले.