वैभववाडी ( प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियांनांतर्गत विद्या मंदिर आखवणे शाळा नं 1 या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर पीएम श्री विद्या मंदीर कोकिसरे महालक्ष्मी द्वितीय, विद्यामंदिर सांगुळवाडी नंबर एक या शाळेने तृतीय क्रमांक पटकावला आहे. माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत तालुकास्तरावर प्रथम आलेल्या या तीन तीन शाळांना अनुक्रमे तीन लाख दोन लाख एक लाख असे बक्षीस मिळणार आहे. हा निधी त्या शाळेच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे.मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा अभियानांतर्गत तालुक्यात प्रथम आलेल्या विद्या मंदिर आखवणे शाळा ही नवीन पुनर्वसन गावठाणात असून ग्रामस्थांच्या सहकार्यातून मुख्याध्यापक अस्लम याकूब पाटणकर, संतोष पुनाजी नागप, ज्योत्स्ना संजय पाटील, वर्षा सहदेव पडुळ, सपनावती चव्हाण, उपशिक्षक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर तळेकर, माजी सरपंच आर्या कांबळे, उपसरपंच आकाराम नागप यांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेच्या भौतिक सुविधासाठी विशेष प्रयत्न केले. आता आखवणे शाळाची जिल्हास्तरावरीय समिती कडून पाहणी करण्यात येणार आहे. शाळेला मिळालेल्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.