आंबडोस ग्रामस्थ , माजी विद्यार्थी, यांचे कौतुकास्पद कार्य
चौके (प्रतिनिधी) : प्राथमिक शाळा आंबडोस क्र.१ च्या आवारातील दगडी संरक्षक भिंत दोन वर्षांपुर्वी अतिवृष्टीमुळे कोसळली होती. सदर भिंत पुन्हा बांधण्यासाठी ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी यांनी पुढाकार घेतला. आर्थिक देणगी आणि बांधकाम साहित्य याची मदत गोळा करून आणि श्रमदान करून संरक्षक भिंतीच्या उभारणीच्या कामास आजपासून सुरुवात करण्यात आली.
संरक्षक भिंत उभारणीच्या कामासाठी ग्रामविकास मंडळ मुंबई , जाणता राजा प्रतिष्ठान , वासुदेव वरवडेकर यांचे आर्थिक सहकार्य लाभले तर चिरेखाण व्यावसायिक श्री. धोंडी नाईक यांनी बांधकामासाठी लागणारे दगड आणि धनंजय नाईक यांनी जे. सी. बी. मोफत उपलब्ध करून दिला. तसेच शिक्षिका स्वप्नाली शिंदे आणि यशोदा गावित यांचे सहकार्य लाभले त्याचप्रमाणे प्रविण मराळ पांडुरंग आरोसकर , रमेश कदम , रामचंद्र परब , संजय चव्हाण, वासुदेव वरवडेकर , बाळू परब , धानजी चव्हाण , महेंद्र धुरी, संजय परब , प्रशांत कदम , प्रमोद कदम , गुरू कदम , दिपक परब , धनंजय नाईक, अजित परब, अमित राणे, रामचंद्र सावंत, राजेंद्र परब , नारायण नाईक , राकेश धुरी , संदिप परब , पुंडलिक नाईक , सचिन परब , राजन परब , बाळू परब , अजित परब , निवृत्ती परब, समीर परब, यश नाईक , आयुष परब , महेश शिंदे , जयेश परब. यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून संरक्षक भिंत उभारणीत सहभाग घेतला.
आंबडोस ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या संकल्पनेतुन प्राथमिक शाळा आंबडोस क्र.१ च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ७ मे रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी एकजुटीने संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आणि तो आज पुर्णत्वास आला.