तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी उपोषणाला बसेन ; सावळाराम अणावकर

चौके (प्रतिनिधी) : अनेक वेळा शासनाला सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांबाबत निवेदन दिली . अनेक वेळा भेटी घेऊन प्रत्यक्ष समस्या मांडल्या. तरीही शासन त्यावर योग्य निर्णय अद्यापही घेत नसल्याने आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी उपोषणाला बसावे लागले तरी मी तुमच्यासाठी उपोषणाला बसेन ” असे आश्वासन 

सिधुदूर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोशियनचे जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी दिले आणि मेळाव्याचे कौतुकही केले. 

सिधुदूर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोशियन शाखा मालवण शाखेच्या वतीने सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक , पदवीधर ‘ मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख , विस्तार अधिकारी यांचा एकत्रित स्नेह मेळावा मालवण तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली दैवज्ञ भवन मालवण येथे नुकताच संपन्न होता . त्यावेळी ते प्रमुख मान्यवर म्हणून बोलत होते . यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा सरचिटणीस. सुंदर पारकर , जिल्हा उपाध्यक्ष नारायण सावंत , जिल्हा सदस्य रुद्राजी भालेकर, श्रीमती सरिता मुननकर , सावंतवाडी तालुकाध्यक्ष दत्ताराम पटनाईक , सचिव रामनाथ राऊळ , सदस्य कल्याण कदम, जिल्हा सदस्य प्रताप बागवे , श्रीकृष्ण पाताडे ‘ माजी तालुकाध्यक्ष उत्तम कदम , तालुका उपाध्यक्ष श्यामसुंदर मालवदे व ज्ञानदेव ढोलम तसेच माधव गावकर , मनाली फाटक , सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक , विस्तार अधिकारी उपस्थित होते . 

या स्नेहमेळाव्यामध्ये उपस्थित निवृत्त शिक्षकांना डॉ. किरण गोसावी यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन करताना वयोमानानुसार कोणकोणते आजार होतात , त्यासाठी कोणकोणत्या चाचण्या कराव्या लागतात , कोणती काळजी घ्यावी लागते , कोणता आहार घ्यावा लागतो , याबाबत सविस्तर माहिती दिली . या मेळाव्यामध्ये सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी आपले कलागुण सादर केले . यामध्ये श्री . सदानंद कांबळे . मनाली फाटक .रूपाली पेंडूरकर , आनंद धुत्रे, दीपक पाताडे , विजय चौकेकर आदिनी आपले कलागुण सादर केले . तर माधवराव गावकर यांच्या नाट्यसंगीत मैफलीचा आस्वाद उपस्थित शिक्षकानी घेतला . यावेळी सुंदर पारकर . नारायण सावंत . दत्ताराम पटनाईक . उत्तम कदम , प्रताप बागवे , कृष्णा पाताडे , यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . तालुकाध्यक्ष अध्यक्ष श्री . विजय चौकेकर यांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांचा शासन स्तरावर पाठपुरावा करून सोडविण्याचा माझ्या अध्यक्ष कालावधीत निश्चित प्रयत्न करेन असे आश्वासन दिले . 

स्नेहमेळाव्याचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण पाताडे व श्रीमती श्रुती गोगटे यांनी केले प्रास्ताविक ज्ञानदेव ढोलम यांनी केले अहवाल वाचन रूपाली पेंडूरकर तर आभार प्रदर्शन रामचंद्र वाळके यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!