जलजीवनच्या भूमीपूजनला आलेल्या निलेश राणेंना एका व्हाळावरच नारळ फोडून फिरावे लागले मागे
कुडाळ (प्रतिनिधी) : भडगाव खुर्द गावामध्ये निलेश राणे येणार व जलजीवन मिशन नळयोजना, ब्राम्हणवाडी रस्ता यांची भूमिपूजन करणार असल्याची जाहिरात शनिवारी गावातील राणे समर्थक मंडळींकडून करण्यात आली. वस्तुस्थिती अशी की जलजीवन मिशनची विहीर ही शिवसेनेच्या पाठपुराव्यातून तसेच आमदार वैभव नाईक यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानुसार मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच ब्राम्हणवाडी रस्ता कामासाठी बजेट मधून आमदार वैभव नाईक यांनीच ९ लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. असे असताना खोटं बोलण्याच्या राणे समर्थकांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे हे काम आम्ही मंजूर केले असे भासवत कामाच्या भूमीपूजनाचा घाट घालण्यात आला होता.
कामांच्या मंजुरीसाठी निलेश राणे यांचा काहीही संबंध नसताना या कामाचे ते भूमिपूजन करणार म्हटल्यावर गावातील शिवसैनिक एकवटले व मंदिरासमोर भूमिपूजन होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला.निलेश राणेनी ग्रामस्थांची मनधरणी कराण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी शिवसैनिकांसमोर आपला निभाव लागणार नाही हे लक्षात येताच राणेंना घेऊन आलेल्या गावातील ५, ६ कार्यकर्त्यांनी भूमिपूजनाचे नियोजित स्थळ बदलून ज्या ठिकाणी नळ योजनेचा काहीही संबंध नाही अशा एका व्हाळावर बॅनर लावून राणेंच्या हस्ते नारळ फोडून घेतला.