पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दहा कोटी रुपये लाच ऑफर करणाऱ्या भ्रष्ट अधीकाऱ्याचे नाव जाहीर करावे – मनसेचे आवाहन

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दहा कोटी रुपये लाच ऑफरप्रकरणी मनसेची लाचलुचपत विभागाकडे तक्रार

सखोल चौकशीअंती कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी

कुडाळ (प्रतिनिधी) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मधील बड्या अधिकाऱ्याने पालकमंत्री यांना तब्बल दहा कोटी रुपयांची लाच ऑफर केल्याची माहिती स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दैनिक तरुण भारतला मुलाखतीत दिली.दिलेल्या माहितीनुसार त्या बड्या अधिकाऱ्याने आपण सांगू त्या फाईलवर सह्या केल्यास सर्व खात्यांतर्गत पैसे जमा करून दर महिन्याला दहा कोटी रुपये देण्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समोर मान्य केले. या कृत्यासाठी शिक्षा म्हणून सदर लाच देणारे अधिकाऱ्यास निलंबित करण्याची गरज असताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्याची जिल्ह्याच्या बाहेर बदली केल्याचे देखील स्वतः दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत आज लुचपत विभाग सिंधुदुर्ग यांना सदर प्रकरणी सखोल चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना चाप बसाव याकरिता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना तब्बल दहा कोटी रुपयांची लाच ऑफर देणाऱ्या त्या बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे मार्फत करण्यात आली. निवेदन देण्याकरिता जिल्हाध्यक्ष धिरज परब,उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,तालुकाध्यक्ष हेमंत जाधव,उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ, जगन्नाथ गावडे , अविनाश अणावकर ,अक्षय जोशी,अनिकेत ठाकुर, सुरज नेरूरकर, वेदांग कुडतरकर आदी महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!