कणकवली (प्रतिनिधी) : दुर्गापासक ऐक्यवर्धक संघ श्री आर्यादुर्गा मंदिर, दुर्गानगर, वागदे यांच्यावतीने आर्यादुर्गा देवीचा नवरात्रोत्सव आश्विन शु. प्रतिपदा गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ ते आश्विन शु. नवमी शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ७ वा. घटस्थापना, श्री देवीची महापूजा, चंडीपाठ, कुमारीपुजन , गुरुवार दि. ३ ऑक्टोबर २०२४ ते शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत होणारे कार्यक्रम – दररोज दुपारी १२ वा. आरती, दुपारी ३ ते ३.३० वा. पुराण वाचन – श्री.पु.वि. काजरेकर, जांभवडे , सायं. ३.४५ ते ५.१५ वा. सुश्राव्य कीर्तन – ह.भ.प.श्री. पुरुषोत्तमबुवा पोखरणकर, पोखरण , सायं. ७.३० ते ८.३० वा. दररोज पालखी प्रदक्षिणा, आरती , सायंकाळी ५.३० ते ७.३० वा. होणारे सांस्कृतिक कार्यक्रम – गुरुवार दि. ३ ऑक्टोबर २०२४ महापुरुष भजन मंडळ, नागवे ( भटवाडी ) यांचे भजन , शनिवार दि. ५ ऑक्टोबर २०२४ श्री. मुकुंदराव क्षीरसागर जोधपुर यांचे गायन , रविवार दि. ६ ऑक्टोबर २०२४ आदर्श संगीत विद्यालय कणकवली प्रस्तुत शास्त्रीय व सुगम संगीत गायन मैफल ” तेजोमय नादब्रह्म “, सोमवार दि. ७ ऑक्टोंबर रोजी भावगंध रत्नागिरी प्रस्तुत ” भावभक्ती ” नाट्यगीत मैफल , गुरुवार दि. १० ऑक्टोंबर अष्टधान सेवा रात्रौ ८ वा, शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी नवरात्रोत्थापणा, दसरा सायं. ४ ते ५ वा लळीताचे कीर्तन , सायं ५.३० वाजता सोने लुटणे , रविवार दि .६ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद तरी सर्व भक्तजनांनी उपस्थित राहून देवी दर्शन, व इतर सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.