स्वच्छता ही सेवा २०२ अभियान अंतर्गत वैभववाडीत चित्रकला स्पर्धा संपन्न

नगरपंचायत वाभवे -वैभववाडी यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे -वैभववाडी नगरपंचायत आयोजित स्वच्छता ही सेवा २०२४ अभियान अंतर्गत वैभववाडी शहरातील शैक्षणिक संस्थां मर्यादित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार दि.३०-०९-२०२४ रोजी अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि विद्यामंदिर केंद्र शाळा वैभववाडी येथे स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेसाठी स्वच्छता ही सेवा, स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता, स्वच्छ भारत अभियान, वाभवे -वैभववाडी शहराला लाभलेली नैसर्गिक संपन्नता आणि ती जोपासण्यासाठी माझी जबाबदारी, स्वच्छतेतून समृद्ध पर्यावरण, वेस्ट टू बेस्ट, सफाई कर्मचारी ‘खरे हिरो’, रीड्युज,रियुज, रीसायकल, प्लास्टिकचा वापर टाळू, वाभवे -वैभववाडी शहर स्वच्छ ठेवू, ओल्या कचऱ्यापासून करु घरच्या घरी खत निर्मिती, स्वच्छ वाभवे -वैभववाडी सुंदर वाभवे -वैभववाडी, कचरा मुक्त शहर, शहर स्वच्छतेबाबत इतर नाविन्यपूर्ण संकल्पना असे एकूण १४ विषय देण्यात आले होते. ही स्पर्धा चौथी ते सातवी छोटा गट, आठवी ते दहावी मोठा गट आणि अकरावी ते पदवीपर्यंत खुला गट अशा तिन गटात घेण्यात आली. क्युआर कोड द्वारे विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी करण्यात आली. छोट्या गटात ६४ विद्यार्थी, मोठ्या गटात ३० विद्यार्थी तर खुल्या गटात १४ विद्यार्थी असे एकूण १०८ स्पर्धेक या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांना कलाशिक्षक मंदार चोरगे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून शिक्षक संदेश तुळसणकर यांनी काम पाहिले.

या स्पर्धेवेळी नागराध्यक्षा नेहा माईणकर उप संजय सावंत मुख्याधिकारी प्रतीक थोरात प्रशासन व करनिर्धारक उमेश स्वामी, स्वच्छता निरीक्षक सतिश सांगेलकर , लिपिक सचिन माईणकर तसेच सर्व नगरसेवक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!