जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालयाचे यश

भालाफेक खेळ प्रकारात वेलांकिनी अटकेकर जिल्ह्यात प्रथम विभागीय स्तरावर निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाअधिकारी सिंधुदुर्ग व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत भाला फेक या खेळ प्रकारात वैभववाडी येथील अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय नाधवडे ची विद्यार्थिनी वेलांकिनी दिपक अटकेकर हीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून तिची विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रशालेच्या मुख्याध्यापक अलदार व शिक्षिका पवार यांनी वेलांकिनीला या खेळाबाबत प्रोत्साहन व मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल संस्था संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ यांनी वतीने अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!