आचरा (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कणकवली उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांचा सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कणकवली शहरात गणेशोत्सव व नवरात्रोत्सव या दोन्ही सणांच्या वेळी महावितरण वीज कंपनीने विजेची व्यवस्था सुरळीत सुरू ठेवली होती. उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी योग्य नियोजन करून लाईट सुरळीत सुरू ठेवल्याने ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या निवेदनानुसार कणकवली शहरातील वीज समस्यांबद्दल दोन महिन्यापूर्वी निवेदन दिलेले होतं त्या निवेदनानुसार कणकवली शहरातील जळकेवाडी, परबवाडी, शिवाजीनगर,मच्छी मार्केट, या ठिकाणी लो होल्टेज होता. संघटनेच्या निवेदनानुसार विज दाब व्यवस्थित सुरळीत करून देण्यात आला. तसेच माऊन मळा या ठिकाणी असणाऱ्या ग्रामस्थांना कणकवली फीडर वरून वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यात येण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच सातरल येथील घरालगत असणाऱ्या वीज वाहक तारा ब्रॅकेट टाकून घराला अडथळा येणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था करून दिली.
संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या सर्व कामांची वेळीच दखल घेऊन कामांची पूर्तता केल्याबद्दल संघटनेच्या वतीने उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांचा सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, नूतन तालुकाध्यक्ष मंगेश चव्हाण,नूतन कार्याध्यक्ष संजना सदडेकर,उपाध्यक्ष डॉ.हर्षदकुमार पटेल, सचिव सदाशिव राणे,सदस्य भरत तळवडेकर उपस्थित होते.











