“सहकाराच्या माध्यमातून समाजाची आर्थिक बाजू भक्कम करणार…”– अरविंद वळंजु
खारेपाटण (प्रतिनिधी) : “आपल्या बौद्ध समाजाची जिल्ह्यात एक पतसंस्था असावी. हे आपले सर्वांचे स्वप्न होते. परंतु,तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपले हे स्वप्न पूर्णत्वास जात असल्याचा आनंद आज होत आहे. भविष्यात सहकाराच्या माध्यमातून समाजाची आर्थिक बाजू भक्कम करणार असल्याचे भावपूर्ण उदगार तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्ग या संस्थेचे मुख्य प्रवर्तक श्री अरविंद वळंजू यांनी कणकवली येथे भगवती मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या संस्थेच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना काढले.”
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच मागासवर्गीय बौद्ध समाजाची तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सिंधुदुर्ग नावाने रजिस्टर करण्यात आली असून या संस्थेची पहिली वार्षिक सर्वादरण सभा आज संस्थेचे मुख्य प्रवर्तक श्री अरविंद वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे आज रविवार दि . २७ ऑक्टोंबर २०२४ रोजी संपन्न झाली. या सभेला संस्थेचे सहप्रवर्तक श्री सूर्यकांत कदम,के एस कदम, मिलिंद जाधव,मोहन जाधव,मिलिंद सर्पे,पी डी जाधव,आर डी कदम, कांता जाधव,सिद्धार्थ कदम,सौ. रुपाली पेंडूरकर, सौ.श्रद्धा कदम यांसह डी के पडेलकर,महेश परुळेकर,संतोष पाटणकर,सुभाष कांबळे,विजय कदम,सिद्धार्थ तांबे, श्री महाभोज, प्रमोद कासले आदी समजतील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी भ.बुद्धंच्या प्रतीमेला संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंद वळंजू यांचे शुभहस्ते पुष्प अर्पण करून व त्रिसरन पंचशील वंदना सामुदायिक घेऊन तसेच भारतीय संविधानाच्या प्रस्तविकेचे वाचन करून वार्षिक सभेची सुरवात करण्यात आली. संस्थेच्या उभारणीत समाजातील ज्या सभासदानी आर्थिक व सामजिक सहकार्याचे योगदान दिले त्याचा सत्कार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला.यावेळी जिल्हा सहकारी निबंधक कार्यालयाकडून संस्थेला मिळालेले रजिस्टर प्रमाण पत्र सौ.रुपाली पेंडूरकर यांनी सभागृहात वाचून दाखवले.
सदर संस्थेच्या वार्षिक सर्वसाधरण सभेचे प्रास्ताविक श्री सूर्यकांत कदम यांनी केले.तर सर्व उपस्थित सभादांचे स्वागत मिलिंद सर्पे यांनी केले.तसेच संपूर्ण सभेचे सूत्रसंचलन मोहन जाधव यांनी केले.
या सभेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली,देवगड,वैभववाडी, कुडाळ,मालवण,वेंगुर्ला,सावंतवाडी दोडामार्ग या आठ तालुक्यातून सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लवकरच बौद्ध समाजाच्या नव्याने उदयास आलेल्या जिल्ह्यातील तथागत नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा कर्यालयाचे उद्घघाटन जिल्ह्यातील मध्यवर्ती ठीकणी कणकवली येथे करण्यात येणार असल्याचे यावेळी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.शेवटी संस्थेचे
सचिव श्री सुनील कदम यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.