दामू सावंत यांची शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले नियुक्तीपत्र

कणकवली (प्रतिनिधी) : दामोदर उर्फ दामू सावंत यांची शिवसेनेत वापसी झाली असून त्यांची शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दामू सावंत यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी सावंतवाडी माजी नगराध्यक्ष राजन पोकळे, जिल्हा बँक संचालक नित्यानंद परब उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांनी दामू सावंत यांची उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती केली आहे.

error: Content is protected !!