1 महिन्याची मुदत; अन्यथा प्रतिदिन 2 हजार दंड आकारून कारवाई करण्याचा ग्रा. पं. चा इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ कुंभारवाडी येथील रस्त्यालगत भंगार व्यावसायिक मऱ्याप्पा इंगळे यांनी अनधिकृत उभारलेल्या शेड तोडण्यासाठी आज पोलीस बंदोबस्तात सरपंच संदीप मेस्त्री तसेच ग्रा.पं. सदस्य नितीन पवार, पपू यादव, दिनेश गोठणकर, अनुप वारंग, श्रेयश चिंदरकर, महेश लाड यांच्यासह ग्रा.पं. पथकाने धडक दिली. शेडपासून रस्त्यापर्यंत साठवून ठेवलेले भंगार जेसीबी झने बाजूला हटवण्यात आले. यावेळी अनधिकृत शेड बांधकाम करणारे मऱ्याप्पा इंगळे व त्यांचा मुलगा विजय इंगळे यांनी शेड बांधकाम स्वतः तोडतो, 6 महिन्यांची मुदत द्या, अशी मागणी केली. मात्र सरपंच संदीप मेस्त्री यांनी अनधिकृत शेड तोडण्यासाठी 1 महिन्याची मुदत देत 17 एप्रिलआधी सदरचे अनधिकृत बांधकाम न तोडल्यास प्रतिदिन 2 हजार रु. दंड आकारून ग्रामपंचायतमार्फत बांधकाम तोडणार असल्याचे सांगत पंचयादी केली.