नितेश राणेंच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचाही मोलाचा वाटा

विजयी हॅट्ट्रिकनंतर नितेश राणे- अबिद नाईक यांची गळाभेट झाली व्हायरल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघातून तब्बल 58 हजार मतांच्या लिडसह महायुती चे उमेदवार नितेश राणे यांनी अभूतपूर्व यश मिळवले. नितेश राणे यांच्या दैदिप्यमान यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सदिच्छा भेट घेत अभिनंदन करताच आमदार नितेश राणे यांनी अबिद याना जवळ घेत आनंदाने गळाभेट घेतली. महायुती चे उमेदवार नितेश राणे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली होती. कणकवली देवगड आणि वैभववाडी तालुक्यात अबिद नाईक व त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यानी गाववार बैठका घेत नितेश राणे यांचा प्रचार केला होता. तसेच तिन्ही तालुक्यातील मुस्लिम बांधवांमध्ये जाऊन स्थानिक पातळीवर नीतेश राणे यांनी मुस्लिम समाजासाठी केलेली विकासकामे पोचवून नितेश यांच्या प्रचारकार्यात अबिद नाईक यांनी आघाडी घेतली होती. नीतेश राणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते अगदी प्रचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत अबिद नाईक यांनी जीवतोड मेहनत घेतली होती. नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात रेकॉर्डब्रेक लीड घेत विजय मिळवला. त्यानंतर काढलेल्या विजयी मिरवणुकीत अबिद नाईक सहभागी होते. तत्पूर्वी सदिच्छा भेटीवेळी आमदार नितेश राणे यांनी अबिद नाईक यांची गळाभेट घेत आंनद व्यक्त केला.

error: Content is protected !!