देवगड (प्रतिनिधी) : भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस भाजपा पडेल मंडल कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छता ही देशसेवा या संकल्पनेनुसार माजी खा. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेल ग्रा.पं. च्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी कचरासंकलन करण्यासाठी मोठ्या कचराकुंडीचे वाटप भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, पडेल सरपंच भूषण पोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.तसेच प्रत्येक घरोघरीसुद्धा कचरसंकलनसाठी कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले. भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली यांच्या हस्ते माजी खा. निलेश राणे यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस रामकृष्ण जुवाटकर, श्री. रवी पाळेकर ,माजी उपसभापती श्री. रवींद्र तिर्लोटकर,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. गणेश राणे, महिला तालुका अध्यक्ष सौ. संजना आळवे, सौ. केळकर, शक्ती केंद्रप्रमुख अंकुश ठुकरुल, शक्ती केंद्रप्रमुख संदीप तावडे, किशोर तानवडे, राजू मेस्त्री, गुरु आंबेरकर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.