वैभववाडी शहरातील दोन बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली.

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील प्रभाग क्र. १२ व १३ प्रभागातील दोन बंद घरे अज्ञात चोरट्यानी फोडली आहेत.ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. मात्र घर मालक मुंबईला असल्यामुळे अद्यात पोलीस तक्रार देण्यात आली नाही. शहरात भर वस्तीत दोन घरे फोडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वैभववाडी शहरात चोरट्यांकडून बंद घरांना टार्गेट केले जात आहे. वैभववाडी शहरातील एका घरात तळमजल्यात दोन भाडोत्री राहता. तर स्वतः मालक वरच्या मजल्यावर राहातात. घर मालक काही दिवसापूर्वी मुंबईला गेले आहेत. तर एक भाडोत्री शनिवारी संध्याकाळी मुंबईला गेले आहेत. याचा फायदा घेत चोरट्यांनी तळमजल्याची बंद खोली फोडली. खोलीतील कपाट फोडून कपाटातील साहित्य उसकटून टाकले. मात्र त्यांच्या खोलीतील नेमके काय चोरीस गेले आहे हे समजू शकले नाही. तर प्रभाग क्र. 13 मध्येही एक बंद घर फोडले आहे. मात्र या घरात चोरट्याच्या हाती काही लागले नाही. पोलिसांना माहिती मिळताच दोन्हीही घटनास्थळी पोलीसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. मात्र उशिरापर्यंत याबाबत रीतसर तक्रार देण्यात आली नव्हती.. शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारे बंद घरांना चोरट्याकडून टार्गेट केले जात आहे. पंधरा दिवसापूर्वीही असेच एक बंद घर चोरट्यांनी फोडले होते. मात्र त्याच्या हाती काहीच लागले नव्हते. त्यामुळे मालकांनी तक्रार दिली नव्हती..  

error: Content is protected !!