संदेश पारकर यांना 100 टक्के मतदान करण्याचा दहिबाव वासियांचा निर्धार
देवगड (प्रतिनिधी) : किंजवडे जिल्हा परिषद मतदार संघात दहिबाव येथील प्रसाद परब यांच्या घरी संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ बैठक संपन्न झाली.. गेली दहा वर्ष येथील भागात काहीच प्रगती झाली नाही तेथील स्थानिक आमदाराने लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा काम केलं.. या भागातील तरुणांना गेल्या दहा वर्षात कोणत्याही प्रकारचा रोजगार देऊ शकला नाही आणि स्थानिकांना कोणत्याही प्रकारचे काम देऊ शकला नाही अशा आमदाराला येत्या विधानसभेच्या निवडणुकीला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही असा निश्चय या बैठकीत करण्यात आला.. भूलथापा मारणारे आमदारापेक्षा सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी कायमस्वरूपी उभा राहणारा संदेश भाई पारकर सारखा आमदार पाहिजे असे उद्गार जमलेल्या नागरिकांनी काढले त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये संदेश पारकर यांना या प्रभागातून 100% मतदान करण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला…यावेळी त्यांच्यासोबत युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, प्रसाद परब, देवा खोत, मनोज भावे, दीपक पवार, जयेश गावकर, अमर तांबे, निलेश परब, कमलाकर खोत, देवानंद खोत तसेच स्थानिक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते….











