खारेपाटण येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ संपन्न

शिवसेना उमेदवार संदेश पारकर याना भरघोस मताने निवडून आणण्याचा कार्यकर्त्यांच्या निर्धार

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली देवगड विधानसभा मतदार संघात सद्या सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून खारेपाटण येथे देखील महाविकास आघाडीचे उमेदवार तस्था उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच शनिवार दि. ९ रोजी सकाळी ११.०० वाजता शिवसेना महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थित श्री देव कालभैरव मंदिर व श्री देव रवळनाथ मंदिरात श्रीफळ फोडून करण्यात आला.

यावेळी शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर, महिला तालुका प्रमुख वैदही गुडेकर, युवा सेना उपतालुका प्रमुख तेजस राऊत, खारेपाटण विभाग प्रमुख बाळा राऊत युवा सेना विभाग प्रमुख निखिल गुरव, उपविभाग प्रमुख शिवाजी राऊत, कणकवली उपशहर महिला प्रमुख दिव्या साळगावकर, शेजल पारकर, शाखा प्रमुख रोहिणी पिळणकर, माजी उपविभाग प्रमुख सुधीर गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व संदेश पारकर समर्थक गंगाराम गुरव, सुधाकर कर्ले, शाखा प्रमुख दिगंबर गुरव, सुनील कर्ले, संतोष तुरळकर, शिवसेना ज्येष्ठ कार्यकर्ते श्री संतोष पराडकर,शंकर राऊत, किरण गुरव, संतोष शेट्ये यांसह संदेश घाडी, गणेश गुरव, सुमित गुरव, मयूर गुरव, समीर गुरव हरीचंद्र गुरव, प्रवीण गुरव, प्रकाश नानिवडेकर, राजा गुरव, विक्रांत गुरव, रमेश गुरव, सहील गुरव, बाबू कोळसुलकर, सुहास गुरव, मोहन गुरव, गणेश सुतार दीपक कशेळकर, ज्ञानदेव सुतार, दत्ताराम पराडकर, विशाल गुरव, राहुल गुरव, सुरेश गुरव, अभिजित गोसावी, वसंत चव्हाण, अमोल गुरव, सुजित गुरव, सूरज पाटील, हेमा पाटील, सुनीता गुरव, विलास गुरव, दीपक सुतार, अभिषेक गुरव, संदेश चीके, नितेश राणे कुणाल गुरव आदी शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खारेपाटण येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश भाई पारकर याना खारेपाटण शहरा मधून जास्तीत जास्त मतदान करून भरघोस मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!