नडगिवे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विभागीय सेपक टकराव स्पर्धेत यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे या शाळेतील विद्यार्थ्यांनी सातारा येथे झालेल्या विभागिय सेपक टकराव स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांनी विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. उपसंचालक क्रीडा व युवक सेवा विभाग कोल्हापूर यांचेवतीने दी. १० व ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी सातारा येथे कोल्हापूर विभागिय सेपक टकरा क्रीडा स्पर्धेत संपन्न झाल्या होत्या. या स्पर्धेत नडगिवे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या १४ वर्षाखालील गटातील मुलांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त केला असून याच शाळेतील १७ वर्षाखालील गटातील मुलांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक अमोल चौगुले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी विभागीय सेपक टकराव क्रीडा स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल शाळेच्या मुख्यद्यापिका नीलम डांगे व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शालेय विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!