मुंबई येथे पायरी सावक संघ नडगिवे यांच्या वतीने

धम्मचक्र प्रवर्तन दिननिमित्त समाज बांधवांचा स्नेहमेळावा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : पायरी सावक संघ नडगिवे (रजी).मुंबई व संघमित्रा महिला मंडळ नडगिवे या मंडळाच्या वतीने रुषी मेहत हॉल ताडदेव मुंबई येथे नुकताच ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोका विजयी दशमी दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नडगिवे येथील मुंबई स्थित बौद्ध समाज बांधवांचा स्नेहमेळावा कार्यक्रम देखील संपन्न झाला. पायरी सावक संघ नड गिवे या मंडळाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष प्रभाकर पगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात समजातील १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. तर संघाचे ग्रामीण विभागाचे सचिव दिपक केशव पगारे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी विशेष माहिती देऊन आपले विचार व्यक्त केले.

यावेळी मंडळाच्या सभासदाच्या ज्या पाल्यानी दहावी/बारावी परीक्षेत यश मिळविले सी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सभासदांना व त्यांच्या मुलांना प्रशस्तिपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. याला उपस्थित समाज बांधवांनी उस्फुर्त दाद दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव नितीन पगारे यांनी केले. शेवटी मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर पगारे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!