खारेपाटण (संतोष पाटणकर) : महाराष्ट्रात सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील खारेपाटण शहरात व येथील बाजारपेठेत महाराष्ट्र पोलीस दल सिंधुदुर्गच्या कणकवली पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस कर्मचारी व सी आय एस एफ च्या ४२ जवानांच्या वतीने कणकवली पोलीस उपनिरीक्षक श्री. हडळ यांच्या नेतृत्वाखाली परेड करत संचलन करण्यात आले.
राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था चोख राहण्याच्या दृष्टीने समाजात शांतता राहण्याच्या उद्देशाने आज खारेपाटण एस. टी. बस स्थानक ते खारेपाटण बाजारपेठ मार्गे घोडेपाथर बंदर बंदरवाडीपर्यंत पोलिसांनी संचनन केले. यावेळी खारेपाटण पोलीस दुरशेत्राचे पोलीस कर्मचारी श्री पराग मोहिते व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच केंद्र सरकारच्या सी एस एफ एच सुरक्षा दलाचे जवान उपस्थिती होते.