आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावातील अनेक साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून दिलेले, साहित्य क्षेत्रात महाराष्ट्र राज्यात आपल्या त्रिंबक गावासह, आपले नाव उज्ज्वल करणारे जेष्ठ साहित्यिक रत्नागिरी दापोली येथे कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक बाबू घाडीगांवकर यांचा श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदरच्यावतीने नुकताच अध्यक्ष प्रकाश मेस्त्री व कार्यवाह हेमांगी खोत यांच्या हस्ते सहृदय सत्कार करण्यात आला.
यावेळी खजिनदार देवेंद्र हडकर, जनता विद्या मंदिर त्रिंबकचे निवृत्त मुख्याध्यापक उदय मेहेंदळे, सरपंच-ग्रंथपाल स्वरा पालकर, हिमाली अमरे, केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर, जान्हवी घाडी, विवेक परब, सिद्धेश गोलतकर, राजेंद्र प्रसाद गाड, महेंद्र मांजरेकर, रावजी तावडे, मनवा चिंदरकर, सचिन टवटे, निशिगंधा वझे, उज्ज्वला पवार, भूषण दत्तदास आदी उपस्थित होते












