दिनदर्शिका – २०२५ चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन संपन्न…
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील संभाजी नगर गुरववाडी विकास मंडळ,मुंबई यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी काढण्यात आलेल्या दीनदर्शिका – २०२५ चे प्रकाशन सोहळा आज रविवारी मुंबई दादर येथील कोतवाल गार्डन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कार्यक्रमाला खारेपाटण गावचे उपसरपंच महेंद्र गुरव, सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव यांची विशेष उपस्थिती होती. तर संभाजी नगर गुरववाडी विकास मंडळ मुंबई चे अध्यक्ष सूर्यकांत गुरव, उपाध्यक्ष सुरेंद्र गुरव, चिटणीस – राजेंद्र गुरव तसेच मुंबई मंडळाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव व सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव यांनी दिनदर्शिका – २०२५ प्रकाक्षण सोहळा उपक्रमाचे कौतुक करून संभाजी नगर गुरववाडी विकास मंडळ मुंबईला शुभेछा दिल्या.












