बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जिल्ह्यात न्याय यात्रा काढण्यापेक्षा पंतप्रधानाना अत्याचार रोखण्यास सांगा – जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष विजय प्रभू

ओराेस (प्रतिनिधी) : बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत आहेत ही निंदनीय गोष्ट आहे. त्याचा मी काँग्रेसच्यावतीने निषेध करतो. परंतू जे सत्ताधारी बांगलादेशात होणाऱ्या हिंदूवरील आत्याचारासाठी सिंधुदुर्गात न्याय यात्रा काढत आहेत त्यांना माझी विनंती आहे त्यांनी देशाचे पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्र मोदी यांना बांगलादेशात होत असलेला अत्याचार थाबंवण्याची विनंती करावी. आपल्या देशाचे पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्र मोदी रशिया सारख्या बलाढ्य देशाला रशिया युक्रेन युद्ध थांबवायला लावू शकतात ते बांगलादेशासारख्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून निर्माण केलेला आणि हल्ली पर्यंत भारताच्या आज्ञेत असलेल्या बांगलादेशाला त्यांच्या देशात होत असलेले हिंदूवरील अत्याचार थांबवायला लावू शकणार नाहीत का? म्हणूनच या जिल्ह्यात बांगलादेशातील हिंदूवर होणारा अत्याचाराविरोधात न्याय यात्रा काढून आपली शक्ती फुकट घालवण्यापेक्षा पंतप्रधानाना साकडे घालावे. या जिल्ह्यातील खासदार व सर्व आमदार हे देशातील व राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आहेत त्यांनी सिंधुदुर्गात रस्त्यावर उतरून न्याय यात्रा काढून बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळणार आहे का? त्यांना बांगलादेशातील हिंदूंची खरीच काळजी असेल तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीना विनंती करून सांगीतले पाहिजे की आपण रशिया सारख्या बलाढ्य देशाला रशिया युक्रेन युद्ध थांबवायला लावले त्याचप्रमाणे बांगलादेशात हिंदूवर होणारा अत्याचार थांबवा.

महाराष्ट्रातील अनेक हिंदू शेतकरी रोज आत्महत्या करत आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कधी न्याय यात्रा काढणार आहात असा प्रश्न विचारून जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय प्रभू पुढे म्हणाले गेली दोन वर्षे मणिपूर जळत आहे अनेक हिंदूवर अत्याचार होत आहेत जे हिंदू मणिपूर मध्ये मृत्युमुखी पडले आहेत आणि पडत आहेत ते तर भारतीय आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एखादी न्याय यात्रा काढावी असा टोला त्यांनी लगावला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी हे हिंदू आहेत त्यांना पीक विम्याचे पैसे केंद्र व राज्य सरकारने विम्याचा हप्ता पूर्ण न भरल्यामुळे अजूनही बऱ्याच हिंदू शेतकऱ्यांना विमाची नुकसानभरपाई मिळालेली नाही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कधी न्याय यात्रा काढणार आहात असा सवाल विजय प्रभू यांनी केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!