वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या व्यापारी मेळावा कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : ३१ जानेवारी २०२५ रोजी वैभववाडी येथे होणाऱ्या मेळाव्या निमित्त दि. ८-१२-२०२४ रोजी मंडळाचे जेष्ठ व्यापारी बाळा शेठ पारकर यांच्या हस्ते वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने व्यापारी मेळावा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तेजस आंबेकर. सचिव सुरेंद्र नारकर. खजिनदार नितीन महाडिक, जेष्ठ व्यापारी घोणे मामा, संजय लोके, बंडू सावंत, मनोज मानकर, संतोष कुडाळकर, बंडू गाड, भुईबावडा व्यापारी संघांचे तुकाराम प्रभू, मंगेश गुरव, रवी मोरे, बाजारपेठेतील सर्व व्यापारी तसेच महिला व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!