संविता आश्रमास धान्य व इतर उपयोगी साहित्य केले दान
चौके (प्रतिनिधी) : महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग स्थापित सिंधुकन्या लोक संचलित साधन केंद्र कट्टा मालवण स्थापित साळेल येथिल श्री स्वामी समर्थ ग्रामसंस्था समिती याच्या वतीने व सावली फाउंडेशन याच्या वतीने तसेच हिरकणी व स्त्रीशक्ती स्वयं सहाय्यता महिला बचत गट या दोन गटांचा चौथा वाढदिवस पणदूर येथील संविता आश्रमात केक कापून साजरा करण्यात आला.यानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत संविता आश्रमातील निराधार वृध्द लोकांसाठी मदत कपडे, तांदुळ, कडधान्य, साखर, रवा,काही तरुण मुली यांच्यासाठी काही ज्वेलरी तसेच कपडे व खाद्यपदार्थ यांची मदत दोन्ही बचत गटातील महिलानी केली तसेच ग्रामसंस्था समिती व सावली फाउंडेशन यांनीही यावेळी वृद्धांना मदत केली.यावेळी हिरकणी गटाने आर्थिक मदतही केली संविता आश्रम मधील प्रतिनिधी म्हणून डिसोझा उपस्थित होते व त्यांनी गटाचे आभार मानले.
या कार्यक्रमाला ग्रामसंघाच्या अध्यक्षा विनिता गावडे, सचिव पडवळ, सिंधुकन्याच्या व्यवस्थापिका गीता चौकेकर व सहयोगिनी स्मिता लंगोटे व सी. आर. पी. सिध्दी पवार व ग्रामसंघाच्या सर्व सभासद उपस्थित होते. हिरकणीच्या गटाच्या सुमन पडवळ, सान्वी पोफळे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन केले. स्मिता लंगोट यांनी आभार मानले.दरम्यान अशा प्रकारे प्रत्येकानी स्वताचा वाढदिवस आशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासून साजरा करावा. असे सौ. विनिता गावडे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले आहे. शेवटी सान्वी पोफळे यांनी उपस्थित सर्व मान्यवराचे आभार मानले.