सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : महायुती च्या राज्य सरकारमध्ये सिंधुदुर्ग चे तीन सुपुत्र आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, आमदार आशिष शेलार यांना आज सायंकाळी मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी नागपूर येथे राजभवनावर उपस्थित राहण्यासाठी मोबाईल कॉल केला. आमदार रवींद्र चव्हाण हे पेंडूर गावचे , आमदार नितेश राणे वरवडे गावचे तर आमदार आशिष शेलार हे पणदूर गावचे सुपुत्र आहेत. महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेत महायुती कडून भाजपामधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे तिन्ही सुपुत्र आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.