ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवली मार्फत सजग विद्यार्थी आणि ग्राहक चळवळीविषयी मार्गदर्शन
कणकवली (प्रतिनिधी) : एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवणं हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.त्या उत्पादनाची गुणवत्ता प्रमाण, संख्या, शुध्दता, किंमत या सर्वाची माहिती मिळवण्याचा हक्क ग्राहकाला आहे.तसेच निवड करण्याचा अधिकार देखील आहे.वस्तू खरेदी करण्यासाठी जर तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि त्या ठिकाणी फक्त एकाच बँडच्या वस्तू दुकानदार घ्यायला सांगत आहे.तर लक्षात घ्या कि हे तुमच्या हक्काचे उल्लंघन आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची फसवणूक झाली आहे.तर तुम्हाला तुमचे म्हणणे त्या ठिकाणी मांडण्याचा अधिकार आहे. जर ग्राहकांची फसगत झाली असेल. तर त्याला तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे.कनेडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कनेडीचे मुख्याध्यापक सुमंत दळवी यांच्या उपस्थितीत कनेडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सजग विद्यार्थी आणि ग्राहक चळवळीविषयी मार्गदर्शन ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीच्या अध्यक्षा श्रद्धा कदम यांनी केले.यावेळी सौ कदम बोलत होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायदा १९८६ यामध्ये सांगितलेले अधिकार विशद करून सांगितले.
ग्राहक शिक्षणाच्या अभावामुळे ग्राहकांची फसवणूक होते .असे ग्राहक हक्क चळवळ कार्यकर्ते यांचे म्हणणं आहे. ग्राहक चळवळी विषयी तसेच ग्राहक हक्क याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.प्रत्येक ग्राहक ची कर्तव्ये आहेत. प्रत्येक ग्राहकाला वस्तू खरेदी केल्यावर त्या वस्तूची पावती घेणे आवश्यक आहे.एम आर पी कींमत पाहून तेवढी रक्कम विक्रेताला देणं आवश्यक आहे.इलेटोंंनिक वस्तू खरेदी करताना गंरेंटीकार्ड घेणं आवश्यक आहे.तरच आपण तक्रार दाखल करु शकतो.
जिल्हा ग्राहक मंच न्यायालय राज्य ग्राहक मंच व राष्ट्रीय ग्राहक मंच न्यायालय अशा विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी कनेडी हायस्कूल प्रमाणेच नांदगाव हायस्कूल, एस एम हायस्कूल कणकवली,नाटळ हायस्कूल येथे देखील सजग विद्यार्थी आणि ग्राहक चळवळ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायत कणकवलीच्या अध्यक्षा श्रद्धा कदम,उपाध्यक्ष गितांजली कामत,सचिव पूजा सावंत, जिल्हा सहससंघटिका रिमा भोसले,सहसचिव सुगंधा देवरूखकर यांनी देखील उपस्थित राहून मार्गदर्शन केले. सजग विद्यार्थी कार्यक्रमासाठी सर्व हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.