मालवण (प्रतिनिधी) : मालवण प्रभागस्तरिय स्पर्धेत मुलांनी खिलाडूवूत्तीने खेळ करून नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन माजी पं.स.सभापती उदय परब यांनी येथे केले. मालवण प्रभागस्तरीय बाल,कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ रेकोबा हायस्कूल वायरी मालवण येथे झाला.उदघाट्न सोहळ्यास पंचायत समिती माजी सभापती उदय परब, माजी पं. स. सदस्य देवानंद चिंदरकर, रेकोबा हायस्कूल मुख्याध्यापक हिंडलेकर, सेवानिवृत्त शिक्षक मालंडकर, केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी,केंद्रप्रमुख कृष्णा बागवे, केंद्रप्रमुख राजेंद्र परब, चौके शा. व्य. समिती अध्यक्ष गावडे , मालवण प्रभागातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, क्रीडा शिक्षक,पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.