तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलचे उज्वल यश

पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल व संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष-२०२४-२५ मधील वैभववाडी तालुकास्तरीय ५२ वे विज्ञान प्रदर्शन दि.१२ व १३ डिसेंबर रोजी माधवराव पवार विद्यालय कोकिसरे येथे संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रतिकृती, निबंध, वक्तृत्व व प्रश्नमंजुषा या सर्वच स्पर्धांमध्ये अर्जुन रावराणे विद्यालय जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.

प्राथमिक गट प्रतिकृती मध्ये कु.सिद्धेश संतोष भंडारी ( इयत्ता ८ वी ) याने प्रथम क्रमांक. पटकावला तर निबंध स्पर्धत कु.वैष्णवी गणेश हावळ ( इयत्ता ८ वी ) हिने प्रथम क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गट व उच्च माध्यमिक गटात कु.हर्ष विनोद जांभळे ( ११ वी विज्ञान शाखा याने द्वितीय क्रमांक पटकावला निबंध स्पर्धेत माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात कु.शिवानी रत्नाकर फुकट ( इयत्ता ९ वी ) हिने तृतीय क्रमांक पटकावला तर प्रश्न मंजुषा स्पर्धेत माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात कु.कस्तुरी विलास पाटील ( १० वी ) व कु.चंदना परशुराम गुरव ( ९ वी ) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे व केंद्र प्रमुख गौतम तांबे यांच्या उपस्थितीत पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते सदर विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व वैभववाडी पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या उपस्थितीत अभिनंदन करण्यात आले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पोलिस कॉन्स्टेबल राठोड, मार्गदर्शक विज्ञान शिक्षक-शिक्षिका, सर्व प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!