नागपूर अधिवेशनात भेट घेऊन दिल्या शुभेच्छा
कणकवली (प्रतिनिधी) : कॅबिनेट मंत्री म्हणून नामदार नितेश राणे यांची राजकीय कारकिर्दीच्या पहिल्याच दिवशी सिंधुदुर्ग भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी नागपूर येथील अधिवेशनात भेट घेत अभिनंदन केले. भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री म्हणाले, ना .नितेश राणेंच्या अभ्यासू आणि मेहनती गुणांचा सिंधुदुर्गचा विकासासाठी निच्छित लाभ होईल. त्यांच्यात मेहनत घेण्याची प्रचंड ऊर्जा आहे. त्याचा फायदा कोकणी जनतेला निश्चित होईल. स्थानिक तरुणाईच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी एमआयडीसी, सी वर्ल्ड सारखे प्रकल्प मार्गी लावून नारायण राणे यांच्या कारकिर्दीची आठवण करून देतील असा त्यांचा तरुण सहकारी म्हणून मला विश्वास आहे असे मेस्त्री म्हणाले.












