मंत्री नितेश राणेंमुळे सिंधुदुर्ग विकासाला येणार मोठी गती – सर्वेश दळवी
कणकवली (प्रतिनिधी) : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार नितेश राणे यांची नागपूर येथील विधानभवनात भेट घेत भाजपा युवा मोर्चा कणकवली तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी यांनी शुभेच्छा दिल्या. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज हिवाळी अधिवेशनात मंत्रिपदाच्या कारकिर्दीतील पहिल्या दिवशी नामदार नितेश राणे यांचे विधिमंडळात आगमन झाले. त्यावेळी दळवी यांनी शुभेच्छा दिल्या. कॅबिनेट मंत्री नितेश राणेंमुळे सिंधुदुर्ग च्या विकासाला आणखी गती येणार आहे. पर्यटन रोजगार मूलभूत सुविधा आरोग्य शिक्षण आदी क्षेत्रांत भरीव विकास कामे मार्गी लागतील अशी प्रतिक्रिया सर्वेश दळवी यांनी दिली.












