तळेरे (प्रतिनिधी) : शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व प्राथमिक (पाचवी) व उच्च प्राथमिक (आठवी) शिष्यवृत्ती सराव परीक्षा रविवार 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 ते 12.00 या वेळेत घेतली जाणार आहे. सकाळी 8.30 ते 10.00 या वेळेत पेपर क्रमांक एक होणार आहे. 10.00 ते 10.30 मधली सुट्टी, त्यानंतर 10.30 ते 12.00 या वेळेत पेपर क्रमांक दोन घेतला जाणार आहे. परीक्षा फी रु.50/- आहे. परीक्षा केंद्रे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तसेच 30 परीक्षार्थी संख्या असलेल्या शाळेत परीक्षा केंद्राची सोय करण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या सराव शिष्यवृत्ती परीक्षेचा लाभ घ्यावा,असे आवाहन शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर, सचिव समीर परब,आकाश पारकर, सुष्मिता चव्हाण,सी डी चव्हाण,सुनील जाधव, प्रदीप सावंत,संजय जाधव तसेच दीपक भोगटे, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कट्टा यांनी केले आहे.