कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे वार- बुधवार १७ डिसेंबर रोजी, जीवन विद्येचे शिल्पकार सद्गुरु श्री.वामनराव पै जीवन विद्या मिशन, मुंबई यांच्या मार्फत जीवन जगण्याची कला या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
जीवनाचे विज्ञान आणि सुसंवादी यशस्वी जीवन जगण्याची कला प्रत्येक मानवाला आनंदी बनवायचे आणि जगाला राहण्यासाठी अधिक चांगले ठिकाण बनवणे या नि: स्वार्थ उद्देशाने १९५५ मध्ये जीवनविद्या मिशन नावाची ना- नफा, नोंदणीकृत,धर्मनिरपेक्ष, शैक्षणिक आणि सामाजिक संस्था स्थापन केली.
जीवन विद्या मिशन ही समाजाच्या उत्कृर्षासाठी आणि उन्नतीसाठी झटणारी एक संस्था आहे. सद्गुरु वामनराव पै हे १९५५ सालापासून ह्या संस्थेच्या माध्यमातून जीवन विद्येचे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. “तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या सिद्धांता भोवती जीवन विद्यचे तत्त्वज्ञान फिरते. सुरुवातीच्या काळात मुंबईमध्ये जीवन विद्येचा प्रसार झाला. आज मितीला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जीवन विद्येची केंद्र सुरू झाले आहेत व लाखो लोकांनी जीवन विद्येचा स्वीकार केलेला आहे. जीवन विद्या या जगातील प्रत्येकासाठी सुलभ आणि उपलब्ध होण्यासाठी जीवनविद्याची जीवनमूल्य आत्मसात करा जी चांगल्या मानवाला मानसिकतेत परिवर्तन सुसंवादी विचार प्रेम आणि पर्यावरणाची काळजी याकडे नेत आहेत
या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते व मार्गदर्शक दिलिप निर्मळ, पोलिस उपनिरीक्षक, जीवन विद्या मिशन, मुंबई यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण सुसंस्कार पर्यावरण यांचा मानवी जीवन जगत असताना होणारा अंतर्भाव,राष्ट्र जडणघडणीत विद्यार्थ्यांचा सहभाग, वाढती व्यसनाधीनता, चांगल्या मित्रांची संगत, सकस आहार, सुदृढ शरीर यांचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण म्हणजे ज्ञान संपादन करून घेण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच शिक्षण या शब्दाचा अर्थ शिक अधिक क्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिक्षण घेणे होय. आपल्या आजूबाजूला पक्षी, प्राणी,निसर्ग यांच्याकडून आपणास खूप काही शिकण्यासारखे असते. त्यांचे नैसर्गिक नियम असतात. मानव हा सतत सातत्याने शिक्षण घेत असतो. त्याचे अंतर्मन नेहमी जागृत असते, आपण रात्री झोपतो तेव्हा आपले अंतर्मन हे सतत काही ना काही विचार करत असते. चांगले विचार हे मानवाचे जीवन समृद्ध करते.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक व प्राचार्य सुमंत दळवी, प्रशालेचे पर्यवेक्षक बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार प्रसाद मसुरकर सर यांनी केले.