कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई, ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था असून या संस्थेमार्फत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,तुकाराम शिवराम सावंत ज्युनि.कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी, प्रशालेत नेहमीच आगळ्यावेगळ्या उपक्रमांची मेजवानी सादर होत असते.आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत इनोव्होत्सव या उपक्रमाचे आयोजन होत आहे.या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत. या प्रतिकृतींचे प्रदर्शन शुक्रवार, २० डिसेंबर आणि शनिवार २१ डिसेंबर रोजी माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील ज्ञानदीप सांस्कृतिक भवन, कनेडी सभागृहामध्ये या प्रतिकृतींची मांडणी करण्यात आलेली आहे. या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून एकूण ७० पेक्षा जास्त प्रतिकृती तयार केलेलेआहेत. आपण तयार केलेल्या प्रतिकृतींची माहिती ते स्वतः देणार आहेत. यातून विद्यार्थ्यांमध्ये सादरीकरणाची कला आत्मसात व्हावी, त्यांच्या विचार क्षमतेला चालना मिळावी, आपलं म्हणणं सुयोग्य पद्धतीने त्यांना मांडता यावं, वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा, नवनिर्मिती क्षमतेला संधी मिळावी, आपणही काहीतरी नवीन प्रयोग करू शकतो. हा आत्मविश्वास व सभाधिटपणा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा. या उदात्त हेतूने या सर्व प्रतिकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रतिकृतींचे प्रदर्शन दोन दिवशी असून पहिल्या दिवशी वार- शुक्रवार, दिनांक- २० डिसेंबर रोजी उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.
या उद्घाटनासाठी कार्यक्रमाध्यक्ष सतीश सावंत, अध्यक्ष क.ग.शि.प्र.मंडळ मुंबई,प्रमुख पाहुणे डॉ.सुनिल सावंत, भिरवंडे गावचे सुपुत्र, कवी व लेखक (इ.१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ३५०००/- रुपये किंमतीची ग्रंथसंपदा भेट), संजय सावंत,भिरवंडे गावचे सुपुत्र, (प्रशालेतील खेळाडू विद्यार्थ्यांना ३५०००/- रुपये किंमतीचे दोन कॅरम सेट भेट), किरण तावडे,शरद पुजारी, महाराष्ट्र पोस्टल कॅरम राष्ट्रीय प्रशिक्षक,संजय मेस्त्री, राष्ट्रीय खेळाडू, शालेय समिती चेअरमन आर.एच.सावंत,संतोष सावंत,चंद्रशेखर वाळके, बावतीस गोन्सालविस व सर्व संस्था पदाधिकारी, पालक प्रतिनिधी गंगवणे उपस्थित होते. या पहिल्या दिवशी माध्यमिक विभागातील ४९ विज्ञान प्रतिकृतींचे परीक्षण मान्यवर व परीक्षक यांच्या कडून करण्यात आले. वार- शनिवार, दिनांक- २१ डिसेंबर रोजी उच्च माध्यमिक विभागातील २५ विज्ञान प्रतिकृतींचे परीक्षण परीक्षक करणार आहेत. या सर्व प्रतिकृतींचे प्रदर्शन विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग, माजी विद्यार्थी व कणकवली तालुक्यातील सर्व शाळांसाठी हे प्रदर्शन बघण्यासाठी दोन दिवस खुले राहणार आहे.
सदर प्रतिकृतींच्या परीक्षणा प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, साै.अवटी, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ जिल्हा अध्यक्ष काकतकर ,श्री.शेवाळे यांनी भेट देवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या उद्धाटन कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक व प्राचार्य सुमंत दळवी, प्रशालेचे पर्यवेक्षक बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विज्ञान प्रतीकृतींचे सादरीकरण करणारे विद्यार्थी व प्रशालेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.संपूर्ण उद्घाटन कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार प्रसाद मसुरकर यांनी केले.