हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने गौरव
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण कोष्ट्येवाडी गावचे रहिवासी व वारगाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं.३ चे उपशिक्षक शिक्षक रवींद्र जयराम लोकरे यांचा नुकताच हुतात्मा बहुउद्देशीय विलास कल्याणकारी संस्था ओगलेवाडी, कराड व राठीवडे मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय राज्यस्तरीय सिंधुदुर्ग गौरव पुरस्कार – २०२४ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
शनिवार दी.२७ डिसेंबर २०२४ रोजी जामसंडे हायस्कूल देवगड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात वारगाव जि.प.शाळा क्र.३ चे अपंग शिक्षक रविंद्र लोकरे यांना त्यांच्या शैशाणिक शेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय शैशणिक गौरव पुरस्कार देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी लोकरे यांच्या सुविद्य पत्नी उपस्थित होत्या. या दोन्ही उभयतांचा शाल श्रीफळ,प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी हुतात्मा अपंग बहुद्देशीय विकास कल्याणकारी संस्था ओगलेवाडी कराड या संस्थेचे अध्यक्ष पडतरे साहेब तसेच देवगड तालुक्याचे केंद्रप्रमुख सुदाम जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यांच्या शुभहस्ते सिंधुदुर्ग गौरव पुरस्काराने प्राथमिक शिक्षक रविंद्र लोकरे यांना गौरविण्यात आले.
यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षक रविंद्र लोकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,माझ्या शाळेतील मुख्याद्यापक सत्यवान केसरकर, पदवीधर शिक्षिका अर्चना तळगावकर, उपशिक्षिका वंशिका महाडेश्वर, साळीस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, कासार्डे केंद्राचे केंद्रप्रमुख संजय पवार तसेच मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या सर्वांचे मी आभार मानतो असे सांगितले.