आचरा (प्रतिनिधी) : पळसंब गावठणवाडी येथील प्रकाश कापडी यांच्या शेत मांगरात साप असल्याची माहिती आज अनिल पुजारे यांनी दुरध्वनी वरून माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांना दिली.गोलतकर यांनी लागलीच चिदंर येथील सर्पमित्र स्वप्निल गोसावी यांना पाचारण करत कापडी यांच्या शेत मांगरात गवतात लपून बसलेल्या साडेतीन फूट लांब नाग जातीच्या सर्पास पकडले व नैसर्गिक अधिवासात सोडले.सर्पमित्र स्वप्निल गोसावी यांचे पळसंब ग्रामस्थांच्या वतीने यावेळी आभार मानण्यात आले.
कोणाला कोणत्याही जातीचा साप दिसल्यास त्याला मारू नका तर सर्प मित्राला पाचारण करा. सर्प मित्र सरपटणाऱ्या प्राण्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडतील असे माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी उपस्थिताना आवाहन केले.












