फोंडाघाटवासिय आणि कार्यक्षम मंत्री नितेशजी यांचा दुवा बनून गावचा विकास साधेन – पी. आर. ओ. महेश सावंत !

बाल गोपाळ मंडळ तर्फे महेश सावंत यांचा जाहीर सत्कार ! ग्रामस्थ – मित्रपरिवाराची लक्षणे उपस्थिती !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : माझ्या गावातील माझ्या मित्र परिवाराने आणि ग्रामस्थांनी केलेला माझा सत्कार,माझ्या पुढील वाटचालीत नेहमीच प्रेरणादायी ठरेल. या सत्कारामुळे माझा आत्मविश्वास दुणावला असून, आयुष्यात सदैव स्मरणात राहील.पत्रकारिते पासून सुरू झालेला हा प्रवास, आज मी पब्लिक रिलेशन ऑफिसर (पी . आर.ओ.,) पदापर्यंत पोहोचताना, मला चांगले मित्र लाभले, हे मी माझे भाग्य समजतो. त्यामुळे समाज आणि मंत्री महोदय यांच्यामधील मी दुवा बनून, माझ्या गावाकडून येणाऱ्या समस्या- अपेक्षित योजना-विकास कामे यांचा पाठपुरावा करून, गावाचा बॅकलॉग भरून काढण्याचा, मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. आजच्या सत्कारातून मिळालेले हे प्रेम, येणाऱ्या कारकीर्दीत सदैव पाठीशी राहू दे. असे उद्गार कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचे पी. आर. ओ पदी नेमणूक झाल्यानंतर, फोंडाघाट राधाकृष्ण मंदिरातील बाल गोपाळ मंडळ फोंडाघाट आयोजित जाहीर सत्कार समारंभात महेश सावंत बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात राजू पटेल यांच्या प्रास्ताविकेने झाली. तर सूत्रसंचालन आप्पा पारकर यांनी केले. यावेळी कुमार नाडकर्णी, संतोष टक्के, बबन हळदिवे, संदेश पटेल, राजन नांचे, सुंदरपारकर, सुजाता राणे ,प्रा. जगदीश राणे,रंजन नेरूरकर यांनी महेश चे अभिनंदन करून नव्या इनिंगला शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी, एके काळी फोंडाघाट मध्ये सुवर्णकाळ होता. मात्र काळ बदलत गेला. आणि गाव बॅकलॉग मध्ये गेले.नेतृत्व हरवले. ग्रीन झोन लागू झाला. आणि व्यवसाय ठप्प झाले. पाणी प्रश्न आ ss वासून उभा आहे .पर्यटन वृद्धी साठी विकासात्मक गोष्टी सुरू होणे गरजेचे आहे. जिल्ह्याचे एफएम केंद्र सुरू होणे महत्त्वाचे आहे. व्यवसाय वाढीसाठी मिनी एमआयडीसी सुरू व्हावे, अशा अनेक अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.

त्यानंतर बालगोपाळ मंडळ, राधाकृष्ण मंदिर विश्वस्त, सोसायटी चेअरमन,अध्यक्ष व्यापारी संघ फोंडा तर्फे यशवंत मसुरकर ,आणि त्यानंतर मित्र -परिवारातून भालचंद्र राणे,रवी कोथंबिरे, केसरकर ,समीर मांगले, दीपक इस्वलकर, भाई गुरव, सचिन ताईशेटे, विन्या मोदी,बाळा वळंजू ,संजय नेरूरकर, पवन भोगले ,भाई हळदिवे ,सागर मरिये, सुभाष सावंत, भरत चीके, विश्वनाथ जाधव, महेश भोगले, गजा पेडणेकर, संजय पावसकर, श्याम भुवड, पिंटू पटेल, संजय सामंत यांनी पुष्पगुच्छ देऊन महेश सावंत यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!