दि. ४ जानेवारी २०२५ रोजी भारतीय संविधानावर आधारित परिसंवादाचे आयोजन
राष्ट्रीय संयोजक अँड रावसाहेब मोहन यांची विशेष उपस्थिती
खारेपाटण (प्रतिनिधी) : आपल्या भारत देशात २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अमंबजावणि झाल्यानंतर सुमारे ७५ वर्षाचा काळ उलटला असून या ७५ वर्षात भारतीय संविधानाने आम्हाला काय दिले ? व नागरिकांनी संविधानिक नीतिमत्तेसाठी काय केले ? या विषयावर भारतीय लोकतांत्रिक समाज महासंघ यांच्यावतीने संपूर्ण देशभर भारतीय संविधान – प्लॅटिनम उस्तव वर्ष साजरे केले जात असून यावर आधारित एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन दि.४ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३.०० ते ५.३० या वेळात कणकवली येथे करण्यात आले असून यावेळी भारतीय लोकशाही समाज महासंघाचे राष्ट्रीय संयोजक ऍड. रावसाहेब मोहन हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भारतीय लोकशाही समाज महासंघाचे राष्ट्रीय सहसंयोजक सूर्यकांत कदम यांचे अध्यक्षतेखाली कणकवली जाणवली येथील हॉटेल रिलॅक्स कॉन्फरन्स हॉल येथे संपन्न होणाऱ्या या परिसंवाद कार्यक्रमाला कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते अँड मनोज रावराणे मार्गदर्शन करणार आहेत. तर या कार्यक्रमाला राष्ट्रीय लोकशाही समाज महासंघाचे सहसंयोजक रामेश्वर दयाल (गाझियाबाद, उत्तरप्रदेश),महाराष्ट्र राज्य सह संयोजक अशोक नाग टिळक (नाशिक), अभिषेक पवार हे प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रसिद्ध वृत्त निवेदक निलेश पवार करणार असल्याची माहिती भारतीय लोकशाही समाज महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा युनिटचे कार्यकर्ते विकास तांबे व रोहन कदम यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
आम्ही भारताचे लोक अमृत महोस्तवी वर्षात म्हणजेच प्लॅटिनम महोस्तवात पदार्पण करत असून जगाने आदर्श मानलेली लोकशाही संस्कृती आणि गणराज्य सभ्यता स्वीकारत मानवता,स्वातंत्र्यता, बंधुता आणि न्याय या मार्गावर चालायचे ध्येय आम्ही ठरविले असून या ७५ वर्षात भारतीय संविधानाने आम्हाला काय दिले? आणि आम्ही संविधनिक नितीमत्तेसाठी काय केले ? याचा आढावा घेण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून या परिसंवाद कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय लोकशाही समाज महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.