सुरक्षा पोलीस टाइम्स वृत्तवाहिनी मार्फत सत्यवान यशवंत रेडकर यांचा सत्कार

आचरा (प्रतिनिधी) : सुरक्षा पोलीस टाइम्स वृत्तवाहिनीच्या बोरिवली येथील कार्यालयात दिप्ती दिपक भोगल,संपादिका व दिपक भोगल यांच्या शुभहस्ते, कोकणचे भूमिपुत्र, तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे संस्थापक सत्यवान यशवंत रेडकर, अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांना “राजा शिवछत्रपती पुरस्कार” स्वरूपात पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे गाव व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी सत्यवान यशवंत रेडकर यांचे मोठे योगदान पाहता स्वेच्छेने “सुरक्षा पोलीस टाइम्स” या वृत्तवाहिनीमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंगेश हुमणे,महेश दाभोलकर हे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. हा पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल सर्वच स्तरातून रेडकर सरांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!