गडमठ कदमवाडी येथील युवकाची गळफास घेत आत्महत्या

वैभववाडी (प्रतिनिधी) : गडमठ कदमवाडी येथील राकेश रवींद्र कासले वय ३९ या तरुणाने घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली. याबाबत रघुनाथ महादेव मठकर रा. गडमठ तेलीवाडी यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत खबर दिली आहे.त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

मयत राकेश कासले हा  घरात एकटाच राहात होता. किरकोळ मोलमजुरीचे काम करत होता. परंतु त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याची पत्नी पाच सहा वर्षा पूर्वी त्याला सोडून गेली आहे. तर त्याचा भाऊ मुंबई येथे राहतो. त्यांच्या घरा शेजारी रघुनाथ मठकर हे गवंडी काम करत होते. रविवारी सायंकाळी त्यांनी मयत राकेश कासले याला पाहिले होते. सोमवारी सकाळी ते पुन्हा कामावर आले त्यावेळी त्यांना कासले कुठे दिसला नाही. त्यांनी त्याला हाक मारून पाहिली परंतु त्याला त्याच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांना तो गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. त्यांनी याबाबत शेजारी व नंतर पोलीस ठाणे वैभववाडी येथे खबर दिली. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक किरण घाग, पोलीस संदीप कांबळे, राहुल तळसकर, अभिजित राणे, जितेंद्र कोलते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे आणण्यात आला. मयताचा भाऊ मुंबईला असल्यामुळे तो मंगळवारी गावी येणार आहे. त्यावेळी त्याच्या ताब्यात मृतदेह देण्यात येणार आहे.अधिक तपास पोलीस धनाजी धडे करीत आहेत.

error: Content is protected !!