कोरडा दुष्काळ टळण्यासाठी पाऊस पडण्यासाठी केली प्रार्थना
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात टेंबवाडी येथे प्राचीन काळापासून गणेश चतुर्थीला 11 दिवस संतांच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते नवसाला पावणारा हा कणकवली गावाचा गणपती म्हणुन संतांच्या गणपतीची ख्याती आहे अनंत चतुर्थी पर्यन्त हजारो भाविक संताच्या गणपतीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा करत असतात.
दरवर्षी प्रमाणे शहरातील गणपती दर्शन करताना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी प्रसिद्ध वकील उमेश सावंत यांच्या सोबत कणकवलीचा नवसाला पावनारा संतांच्या गणपतीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली व ह्यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे व ती परिस्थिती दूर होण्यासाठी पाऊस भरपूर पडण्यासाठी गणपतीकडे प्रार्थना केली त्यावेळी संतांच्या गणपतीचे मानकरी सुनील सावंत, संजय सावंत यानी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व प्रसिद्ध वकील उमेश सावंत यांचा सन्मान केला त्यावेळी गणपती मूर्तिकार महेश कुवळे, धीरज साटम आदी उपस्थित होते.












