करूळ घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दरडीचा मोठा भाग रस्त्याच्या मध्यभागी कोसळल्याने संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे घाटाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
दरड कोसळल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने जेसीबी घटनास्थळी पाठविला आहे. दरड हटविण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घाटमार्गावर वाहनचालक अडकून पडल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!