वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक सुमारे अर्धा पाऊण तास ठप्प झाली होती. त्यामुळे घाटाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने जेसिबीच्या सह्यायाने दरड काढून वाहतूक सुरळीत सुरु केली आहे.
करूळ घाटात कोसळलेली दरड काढून वाहतूक सुरळीत












