गुंडू सावंत विरुद्ध विनोद चव्हाण; बांद्यात रंगणार डबल बारी
बांदा (मंगल कामत) : बांदा पोलिस ठाण्यातील श्री देवपाटेश्वर मंदिरातील गणेशोत्सवात सालाबादप्रमाणे यंदाही डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता बांदा पोलिस ठाणे मैदानावर हा भजनाचा सामना रंगणार आहे.
या सामन्यात कुडाळ येथील हनुमान प्रसादिक भजन मंडळाचे बुवा गुंडू सावंत आणि कुडाळभरणी येथील श्री लिंगेश्वर प्रसादिक भजन मंडळाचे बुवा विनोद चव्हाण यांच्यात रंगतदार डबल बारी सामना होणार आहे.
बुवा गुंडू सावंत यांच्या संचात पखवाज वादक विराज बावकर, तबलावादक प्रदीप वाळके असून त्यांचे गुरुवर्य अशोक सावंत आहेत. तर बुवा विनोद चव्हाण यांच्या संचात पखवाज वादक तुषार लोट, तबलावादक अभिषेक सुतार असून त्यांचे गुरुवर्य (कै.) चिंतामणी बुवा पांचाळ आहेत.
या डबलबरी भजनी सोहळ्यास भजनप्रेमी रसिक व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बांदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांनी केले आहे.












