बांदा येथील निवृत्त शिक्षिका सुमित्रा नाईक यांचे निधन

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथील निवृत्त शिक्षिका सुमित्रा मधुसुदन नाईक (वय 83) यांचे शुक्रवारी सकाळी दु:खद निधन झाले. शुक्रवारी रात्री बांदा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन विवाहित मुली, सुन,जावई, नातवंडे असा परिवार आहे.त्या बांदा येथील जि. प. केंद्रशाळा बांदा च्या निवृत्त शिक्षिका होत्या व सिंधुबाई कामत या पुर्वाश्रमीच्या नावानेही ओळखल्या जात.बांदा येथील अमर नाईक यांच्या त्या मातोश्री होत.

error: Content is protected !!