कुडाळ (प्रतिनिधी) : दैनिक नवभारत दैनिक नवराष्ट्र पुरस्कार सन्मान सोहळा कार्यक्रम कुडाळ येथे आयोजित केला होता त्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद यांना आदर्श नगरसेवक लोकप्रतिनिधि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार ब्रिगेड़ीअर सुधीर सावंत यांच्या हस्ते अबिदजी नाईक यांना पुरस्कार देण्यात आला त्यावेळी व्यस्पिठावर कुडाळ नगराध्यक्षा आफरीन करोल, उपजिल्हाधिकारी सोनावाने, कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, नवराष्ट्र संपादक नरेन्द्र कोठेकर, सिंधुदुर्ग आवृत्ति प्रमुख जिल्हा पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, नवराष्ट्र मैनेजर सचिन फूलपगार, जिल्हा अधिकक्षक भूमि अभिलेख विजत वीर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, अभिनेते दिगंबर नाईक, मालवणी सम्राट अंकिता वालावलकर उपस्थित होते